मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक

MSRDC

Blocks for installation of Gantry on Mumbai-Pune expressway

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक

मुंबई-पुणे महामार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

MSRDC

मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (Mumbai – Pune Expressway) पुणे वाहिनीवर कि.मी. ४५/००० अमृतांजन पुल व पुणे वाहिनीवर कि.मी ४५ / ८०० खंडाळा बोगदा येथे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दिनांक १०.१०.२०२३ रोजी करण्यात येणार आहे.

या काळात द्रुतगती मार्गावरील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सी. सी. टीव्ही बसवण्याचे काम केले जाणार आहे. काम पूर्ण झाल्यावर दुपारी २ वाजता पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
भारताला विकसित राष्ट्र घडविण्यासाठी ‘आयुष’ चा सहभाग महत्त्वाचा
Spread the love

One Comment on “मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *