Mumbai Municipal Corporation’s statement in Mumbai High Court that the number of corona patients is decreasing in Mumbai city and surrounding areas.
मुंबई शहरासह आसपासच्या परिसरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचा मुंबई महानगरपालिकेचं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिपादन.
मुंबई: मुंबईशहरासह आसपासच्या परिसरातल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असून परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबईकरांना चिंतेचे कोणतेही कारण नाही, असा दावा, बुधवारी मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयात केला.
कोरोनाचा देशभरातील वाढता प्रादुर्भाव आणि त्यासंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत काही जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल कऱण्यात आल्या आहेत. त्यावर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
ओमायक्रॉन प्रकारचा विषाणु धोक्याची घंटा ठरत असून दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
या विषाणुपासून मुंबईतील नागरिकांना सुरक्षित ठेवण्याबाबत मुंबई महानगरपालिकेने कोणतीही कसर ठेऊ नये, लसीकरण, बेड व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन, ऑक्सिजन पुरवठा यावरील उपाययोजनांबाबत तसेच राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची ठोस अंमलबजावणी करावी, असे निर्देश खंडपीठाने पालिका प्रशासनला दिले होते.
दरम्यान गेल्या पावणे दोन वर्षात मुंबई महापालिकेनं मास्कशिवाय फिरणाऱ्या ४३ लाख नागरिकांकडून तब्बल ८६ कोटीचा दंड वसूल केला आहे.