मुंबई सीमाशुल्क विभागाने सुमारे 270 किलो अंमली पदार्थ केले नष्ट.
मुंबई : मुंबई सीमाशुल्क विभाग (क्षेत्र I)ने बुधवार 29 डिसेंबर 2021 रोजी 269 किलो अंमली आणि मनोवर्ती पदार्थ नष्ट केले.या अंमली पदार्थांमध्ये 191.60 किलो हेरॉईन , 65.20 किलो मेफेड्रोन, 10.02 किलो केटामाइन आणि 1.86 किलो फेनाईलप्रोपॅनोलामाइनचा समावेश आहे.
सीमाशुल्क,महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) आणि पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश असलेल्या अंमली पदार्थ विल्हेवाट समितीच्या उपस्थितीत या अंमली पदार्थाची जाळून विल्हेवाट लावण्यात आली. या अधिकाऱ्यांमध्ये अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे क्षेत्रीय संचालक, सहआयुक्त आणि उपायुक्त (सीमाशुल्क),महसूल गुप्तचर विभागाचे अतिरिक्त संचालक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे.यापूर्वी हे अंमली पदार्थ महसूल गुप्तचर संचालनालयाचे मुंबई क्षेत्रीय विभागाने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जप्त केले होते.