Children do not need to be given any painkillers after vaccination – Bharat Biotech.
मुलांना लसीकरणानंतर कुठलंही वेदनाशामक देण्याची गरज नाही – भारत बायोटेक.
नवी दिल्ली: १५ ते १८ वयोगटातल्या मुलांनी कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर त्यांना पॅरासिटमॉल किंवा इतर कुठलेही वेदनाशामक औषध देण्याची गरज नाही, असं भारत बायोटेक कंपनीनं म्हटलं आहे.
त्यांनीच कोव्हॅक्सिन ही लस विकसित केली आहे. ३० हजार जणांवर घेतलेल्या चाचणीत अंदाजे १० ते २० टक्के जणांना लशीचे साइड इफेक्ट दिसून आले. मात्र तेही किरकोळ स्वरुपाचे होते आणि १-२ दिवसात दूर होणार आहेत.
त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलेही औषध घेऊ नये असं कंपनीनं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.