मुल्यसाखळी उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Appeal to apply for the implementation of the value chain sub-project

मुल्यसाखळी उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील समुदाय आधारीत संस्थाकडून मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

अर्ज शेतमाल, शेळ्या (मांस व दुध) आणि परसबागेतील कुक्कुटपालान (अंडी) यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारीत संस्थामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला अर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे.

अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना याबाबतची माहिती https://www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना संकेतस्थळावर देण्यात आला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी माहिती भरुन व आवश्यक कागदपत्रासह पुणे जिल्हा प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालयात ऑफलाईन ३१ मार्च २०२२ पर्यंत सादर करावेत. यापुर्वी ऑनलाईन अर्ज केलेल्या संस्थांनी परत अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे स्मार्ट प्रकल्प जिल्हा अंमलबजावणी कक्ष प्रमुख यांनी कळविले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *