मोबाईल आणि इंटरनेट वापराचा मुलांवर होणारा परिणाम.
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) अलिकडेच “लहान मुलांकडून इंटरनेट सुविधा असलेले मोबाईल फोन आणि इतर उपकरणांच्या वापराचे परिणाम (शारीरिक, वर्तनात्मक आणि मानसिक-सामाजिक)” या विषयावर एक अभ्यास आयोजित केला , ज्यासाठी देशाच्या सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील 5000 मुलांची नमुन्यादाखल निवड केली.
या अभ्यासानुसार, 23.80 टक्के मुले झोपण्यापूर्वी बिछान्यात असताना स्मार्ट फोन वापरतात, आणि वयानुसार हे प्रमाण वाढते; याचा मुलांवर विपरीत परिणाम होतो. अयोग्य वेळी स्मार्ट फोनचा वापर केल्यास मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. असाच एक परिणाम म्हणजे मुलांमधील एकाग्रतेची पातळी कमी होते.अभ्यासानुसार, 37.15% मुलांना नेहमी किंवा वारंवार, स्मार्ट फोनच्या वापरामुळे एकाग्रता कमी झाल्याचा अनुभव येतो
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारे शिफारस केली आहे – जमिनीचा एक मोठा भाग मुलांसाठी खेळाचे मैदान म्हणून राखून ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे मुलांना विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.