The Indian team for this year’s Women’s Cricket World Cup has been announced under the leadership of Mithali.
मितालीच्या नेतृत्त्वाखाली यंदाच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर.
नवी दिल्ली : बीसीसीआय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आज यंदाच्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली.
मिताली राज या पंधरा सदस्यांच्या संघाचं नेतृत्व करेल तर हरमिनप्रीत कौर संघाची उपकर्णधार असणार आहे.इतर खेळाडू अशा – स्मृती मनधाना, शफाली वर्मा, रिचा घोष- यष्टीरक्षक, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया- यष्टीरक्षक राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव.
राखीव- शब्बिनेनी मेघना, एकता बिश्त आणि सिमरन दिल बहादूर.
भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानशी ६ मार्चला, दुसरा सामना न्यूझीलंडशी १० मार्चला, तिसरा सामना वेस्ट इंडिजशी १२ मार्चला, चौथा इंग्लडशी १६ मार्चला, पाचवा ऑस्ट्रेलियाशी १९ मार्चला, सहावा बांगलादेशशी २२ मार्चला तर सातवा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा साखळी गट सामना होईल.