युटीएस मोबाईल एप्लीकेशन आता हिंदीमध्येही उपलब्ध.

अनारक्षित तिकीट प्रणाली म्हणजेच युटीएस मोबाईल एप्लीकेशन आता हिंदीमध्येही उपलब्ध.

भारत सरकारने ‘डिजिटल भारत’ला चालना देण्यासाठी तसेच रोकड विरहित व्यवहार,  संपर्क विरहित व्यवहार आणि ग्राहक सुविधा ही तीनही उद्दिष्टे ध्यानात घेऊन यूटीएस म्हणजेच अनारक्षित तिकीट प्रणाली आता इंग्लिश बरोबरच हिंदी भाषेतही उपलब्ध करून दिली आहे.

या मोबाईल ॲप वापरकर्त्याला आपल्या पसंतीची कोणतीही एक भाषा वापरता येईल. त्याच प्रमाणे कागदावर छापलेले किंवा डिजिटल अशा कोणत्याही प्रकारातले तिकीट मिळवता येईल. यामध्ये खालील सुविधा मिळतील..

  • प्रवासी तिकीट बुकिंग
  • सीजन तिकीट बुकिंग किंवा नूतनीकरण
  • प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग
  • प्रवाशांना मोबाईल तिकीट प्रणालीचे मिळणारे लाभ
  • तिकिटांच्या रांगेत थांबायची आवश्यकता उरणार नाही.
  • विना कागद आणि पर्यावरणपूरक
  • बुक केलेले तिकीट ऑफलाइन मोडमध्ये सुद्धा TTE वर बघता येईल त्यासाठी इंटरनेट वापरण्याची गरज नाही.

केव्हाही तिकीट काढण्याची सोय प्रवाशांना उपलब्ध होईल. शिवाय अगदी शेवटच्या क्षणी प्रवासाचा निर्णय घ्यावा लागत असेल तर फक्त स्थानकावर पोचून स्थानकावर विविध ठिकाणी असलेला क्यू आर कोड स्कॅन करून घेऊन त्यावरून तिकीट बुक करता येईल. ही सुविधा सध्या सोळाशे स्थानकांवर उपलब्ध आहे.

पूर्णपणे रोकड विरहित :ग्राहक रेल वॉलेट डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यूपीआय आणि वॉलेट्स अशा कोणत्याही डिजिटल पद्धतीने तिकिटाचे पैसे चुकते करू शकेल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *