BJP releases 1st list of 107 candidates for UP assembly elections
यूपी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 107 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरी विधानसभा मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य प्रयागराजमधील सिरथू मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील.
उत्तराखंडच्या माजी राज्यपाल बेबी राणी मौर्य आग्रा ग्रामीण विधानसभेतून भाजपच्या उमेदवार म्हणून लढणार आहेत.
यूपी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने आज 107 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आज नवी दिल्लीत नावांची घोषणा करताना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, या यादीत 63 विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले आहे.
पहिल्या यादीत जवळपास 20 टक्के विद्यमान भाजप आमदारांना तिकीट नाकारण्यात आले आहे. पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंग म्हणाले की, उत्तर प्रदेशचे ऊर्जा मंत्री श्रीकांत शर्मा यांना त्यांच्या विद्यमान मथुरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.