रविवारी 21 नोव्हेंबर 2021 रोजीरस्ते अपघातात बळी पडलेल्या नागरिकांचा स्मरण दिन.

रविवारी 21 नोव्हेंबर 2021 रोजीरस्ते अपघातात बळी पडलेल्या नागरिकांचा स्मरण दिन.

पुणे :- जागतिक पातळीवर रस्ते अपघाताची गंभीरता विचारात घेऊन देण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा उपाययोजनांच्या उद्दीष्टांच्या पार्श्वभूमीवर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी 21 नोव्हेंबर 2021 रोजी रस्ते अपघातात बळी पडलेल्या नागरिकांचा स्मरण दिन म्हणून पाळण्यात येणार आहे.

रस्ते अपघाताप्रती स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसार माध्यमे आणि सामान्य नागरिकांचे लक्ष वेधणे आणि रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. या संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या बैठकीत कार्यकारी गटाची स्थापना करण्यात आली असून जिल्ह्यातील वाहन शाळेचे संचालक तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था सीआयआरटी पुणे यांनी मोटार वाहन विभागासोबत सहभागासाठी पुढाकार घेतला आहे. विविध क्षेत्रातील शैक्षणीक संस्था, स्वयंसेवी संस्था, वाहन वितरक व इतर शासकीय विभाग यामध्ये सहभागी होणार आहे.

जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रांमधील नागरीकांमध्ये रस्ते अपघातविषयक जागृती घडविण्याकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सामान्य नागरिकांचे स्मरण करावे व रस्ते अपघातातील बळींची संख्या शून्यावर आणण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सचिव तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *