The first rank of Sadhana Vidyalaya and RR Shinde Junior College in State Level Ball Badminton Tournament.
राज्यस्तरीय बाॅलबॅडमिंटन स्पर्धेत साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर काॅलेजचा प्रथम क्रमांक
हडपसर : विद्यार्थ्यांमधील खेळाची कौशल्ये व खिलाडूवृत्ती वाढावी व जीवन जगताना या सर्व क्रीडा गुणांचा उपयोग व्हावा यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळा व शासकीय पातळीवर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ व जिल्हा क्रीडा अधिकारी यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय राज्यस्तरीय बाॅलबॅडमिंटन स्पर्धा यवतमाळ येथे संपन्न झाल्या .
या क्रीडा स्पर्धेत साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेज 19 वर्षाखालील मुले या संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या खेळाडूंमध्ये जीवन दिपक शिंदे,ओंकार दिपक कहार,मंजित राजू निकम,मयुरेश राजेश मेमाणे,हर्षद सचिन पवार,उत्कर्ष सतिश भुजबळ,तेजस जयराम ठाकरे,आदेश गणेश देशमुख,हेमराज गणेश मुळेकर,सार्थक काळूराम पवार या खेळाडूंचा समावेश आहे.
या खेळाडूंना विद्यालयातील क्रीडाशिक्षक रमेश महाडीक,कोंडिबा टेंगले,गणेश निचळे,सचिन धोदाड यांनी मार्गदर्शन केले.
क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन दादा तुपे पाटील,जनरल बाॅडी सदस्य दिलीप आबा तुपे,अरविंद भाऊ तुपे,विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी,सहविभागीय अधिकारी शंकर पवार,विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव , उपप्राचार्य डाॅ. अमिरुद्दीन सिद्दीकी,उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत ,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com