राज्याच्या पर्यटन मंत्रालयाकडून राज्य पर्यटन पुरस्कार योजनेची घोषणा.

Announcement of State Tourism Award Scheme by the State Ministry of Tourism.

राज्याच्या पर्यटन मंत्रालयाकडून राज्य पर्यटन पुरस्कार योजनेची घोषणा.

मुंबई: राज्याच्या पर्यटन मंत्रालयानं आज राज्य पर्यटन पुरस्कार योजनेची घोषणा केली. विविध ३९ श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत.Maharashtra State Tourism Development Corporation

राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमीत्तानं आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली. राज्यातल्या पर्यटनाच्या विकासात विविध क्षेत्रातल्या व्यक्ती आणि संस्थांचं मोलाचं योगदान असतं, त्याचा गौरव करण्यासाठी ही पुरस्कार योजना घोषित करत असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.

येत्या एक फेब्रुवारी या पुरस्कारांसाठी अर्ज करता येणार आहेत. याबाबतची अधिक माहिती राज्याच्या पर्यटन संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यावेळी ठाकरे यांनी राज्यसरकारनं पर्यटन विकासासाठी राबवलेल्या योजना आणि उपक्रमांची माहिती दिली. पर्यटन विकासासाठी राज्यातल्या विविध पर्यटनस्थळांची माहिती जागतिक स्तरावर करून देण्याची गरज आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यादेखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *