The government plans to set up a ‘Tourism Development Authority’ for the development of tourist destinations in the state.
राज्यातल्या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ‘पर्यटन विकास प्राधिकरण’ स्थापन करण्याचा सरकारचा विचार.
नाशिक: राज्यातल्या पर्यटनस्थळांची मालकी ही जलसंपदा, वनविभाग, पुरातत्त्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, धार्मिक ट्रस्ट यांची असते. त्यामुळे आंतरविभाग समन्वयासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘पर्यटन विकास प्राधिकरण’ निर्माण करण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
नाशिक जिल्ह्याची पर्यटनविषयक आढावा बैठक काल गंगापूर धरणाजवळ बोटक्लब इथं घेण्यात आली. त्यावेळी ठाकरे बोलत होते.
पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करून नाशिक जिल्ह्यातल्या पर्यटनस्थळांच्या शाश्वत विकासावर भर देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.