राज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीला चाप.

Regional Transport Office, Pune. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News.

राज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन.

राज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीला चाप.

Maharashtra Motor Vehicle Division
Regional Transport Office

खासगी कंत्राटी परवाना वाहनाने संबंधित संवर्गासाठी संपूर्ण बससाठी’ येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या 50 टक्केपेक्षा जास्त भाडे आकारल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. mvdcomplaint.enf2@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे संबंधित संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्य:स्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या ५० टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने दिनांक २७.०४.२०१८ रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत.

राज्यात गणेशोत्सव निमित्त गर्दीचा हंगाम सुरू आहे. या अनुषंगाने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत mvdcomplaint.enf2@gmail.com या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदविण्याची सोय करण्यात आली असल्याने या ई-मेलवर तक्रार नोंदविण्यात यावी, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *