44 thousand 388 new patients of Covid-19 registered in the state today.
राज्यात आज कोविड-१९ च्या ४४ हजार ३८८ नव्या रुग्णांची नोंद.
मुंबई: राज्यात आज कोविड-१९ चे ४४ हजार ३८८ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २ लाखाच्या वर पोचली आहे.राज्यात आज १५ हजार ३५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर, १२ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आज ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले २०७ रुग्ण आढळले. सांगलीत ५७, मुंबई ४०, पुणे महानगरपालिका २२, नागपूर २१, पिंपरी चिंचवड १५, ठाणे महानगरपालिका १२, कोल्हापूर ८, अमरावती ६, उस्मानाबाद ५, बुलडाणा आणि अकोला प्रत्येकी ४, गोदिंया ३, नंदुरबार, सातारा आणि गडचिरोली प्रत्येकी २, तर औरंगाबाद जालना, लातूर आणि मीरा-भाईंदरमधे प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
राज्यात आतापर्यंत १ हजार २१६ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ४५४ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआऱ चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडलं असल्य़ाचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.