राज्यात आज २ हजारांहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद.
मुंबई: महाराष्ट्रात आज बरे झालेल्या रुग्णांपेक्षा सुमारे दुप्पट नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात आज पुन्हा अनेक दिवसांनंतर दोन हजाराहून जास्त, २ हजार १७२ इतके नवे कोरोना रुग्ण आढळले.
राज्यात आज १ हजार ९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर २२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यात आजपर्यंत एकूण ६६ लाख ६१ हजार ४८६जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ६५ लाख ४ हजार ८३१ जण बरे झाले.
सध्या राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६५ शतांश टक्के इतका आहे. सध्या राज्यभरात ११ हजार ४९२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान राज्यात आज एकही नव्या ओमायक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झाली नाही.