राज्यात आढळले ओमायक्रॉन विषाणूचे ११ रुग्ण.
राज्यात आज ओमायक्रॉन विषाणूची लागण झालेले आणखी ११ रुग्ण आढळले. यापैकी आठ रुग्ण मुंबई विमानतळावरच्या तपासणीत आढळले. तर, पिंपरी चिचंवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
राज्यात आतापर्यंत ६५ ओमायक्रॉबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ३४ रुग्णांना, त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडलं असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.
राज्यात आज ७९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ८२५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ५० हजार ९६५ जणांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख ९८ हजार ८०७ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४१ हजार ३६७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ७ हजार १११ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.