राज्यात कोरोनामुळं १०३ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.

103 deaths due to corona were reported in the state.

राज्यात कोरोनामुळं १०३ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.

मुंबई: राज्यात आज कोरोनामुळं १०३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोलापूर शहर आणि सातारा जिल्ह्यात सर्वाधिक प्रत्येकी १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईत १०, पुणे शहरात ८ रुग्ण कोरोनामुळं दगावले.Maharashtra Corona Virus Update राज्यात आज २४ हजार ९४८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ४५ हजार ६४८ रुग्ण बरे झाले. आज सर्वाधिक ३ हजार ३७७ रुग्ण पुणे शहरात आढळून आले तर पुणे जिल्ह्यात १ हजार ४५२ रुग्णांची नोंद झाली. नागपूरमध्ये २ हजार १६१, पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ९९, नाशिक शहरात १ हजार ७२०, मुंबईत १ हजार ३१२ रुग्णांची नोंद झाली.
राज्यात सध्या साडे १४ लाखांहून अधिक व्यक्ती गृह विलगीकरणात तर ३ हजार २०० रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८५ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर नागपूर, ठाणे, नाशिक, मुंबई या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. 

महाराष्ट्रात काल २५ हजार ४२५ नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातल्या एकूण कोविडबाधितांची संख्या ७६ लाख ३० हजार ६०६ वर गेली आहे. काल दिवसभरात ३६ हजार ७०८ जण बरे झाल्यानं एकूण कोविड मुक्तांची संख्या ७१ लाख ९७ हजार एक एवढी झाली आहे. काल दिवसभरात ४२ रुग्णांचा मृत्यू झाला

राज्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ३५८ जण कोविडमुळे मरण पावले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८७ हजार ३९७ रुग्ण कोविडबाधित आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली. राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले ७२ रुग्ण आढळल्यानं या बाधितांची एकूण संख्या २ हजार ९३० झाली आहे. त्यापैकी १ हजार ५९२ जण बरे होऊन घरी गेले आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *