The number of patients under treatment for Covid 19 in the state is close to 6 thousand
राज्यात कोविड 19 च्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ६ हजाराच्या जवळ
रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ, देशात 50 हजाराच्या वर
नवी दिल्ली : कोविड 19 च्या नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या आता देशात 50 हजाराच्या वर, तर राज्यात 6 हजाराच्या जवळ पोचली आहे.
देशात गेल्या 24 तासात एकूण 10,753 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. या कालावधीत एकूण 6,628 लोक बरे झाले आहेत.
देशात आता 53,720 सक्रिय कोविड प्रकरणे आहेत आणि पुनर्प्राप्ती दर 98.69 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, गेल्या 24 तासांत कोविड-19 लसींचे 397 डोस देण्यात आले.
राज्यात काल1 हजार 152 नवे रुग्ण आढळले, 920 रुग्ण बरे झाले. तर 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यात 5 हजार 948 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 98 पूर्णांक 11 शतांश टक्के, तर मृत्यूदर 1 पूर्णांक 82 शतांश टक्के झाला आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com