40 thousand 386 patients recovered from corona in the state.
राज्यात ४० हजार ३८६ रुग्ण कोरोनामुक्त.
मुंबई : कालही दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या ४० हजारांपेक्षा जास्त होती. काल ४१ हजार ३२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली; त्याचवेळी ४० हजार ३८६ रुग्ण कोरोनामुक्तही झाले. आतापर्यंत राज्यात ६८ लाख ९०० रुग्ण कोरोनातून बरे झाले असून, सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ३ दशांश टक्के आहे.
सध्या राज्यात २ लाख ६५ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात काल सर्वाधिक ७ हजार ८९५ नवबाधित मुंबई मनपा क्षेत्रात आढळून आले; तर त्याखालोखाल पुणे मनपा क्षेत्रात ५ हजार ३६३, पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत २ हजार ४७८, तर ठाणे मनपा क्षेत्रात १ हजार ८२५ नवबाधितांची नोंद झाली.
काल कोरोनामुळे राज्यात २९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, मृत्यू दर १ पूर्णांक ९६ शतांश टक्के आहे. राज्यात काल ओमीक्रोनचे ८ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ५ जण पुणे महापालिका हद्दीत तर ३ रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात आढळून आले.
राज्यात आतापर्यंत एकंदर १ हजार ७ ३० ओमीक्रोन रुग्णांची नोंद झाली असून, यापैकी ८७९ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आल आहे.