राज्यात ४० हजार ८०५ नवीन कोरोनाबाधीतांची नोंद. मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट तर पुणे ठरला हॉटस्पॉट

Record of 40 thousand 805 new corona cases in the state.

राज्यात ४० हजार ८०५ नवीन कोरोनाबाधीतांची नोंद.Maharashtra Corona Virus Update

मुंबई: राज्यात काल (दिनांक २३/१/२०२२) दिवसभरात कोरोनाचे ४० हजार ८०५ नवीन रुग्ण आढळले. तर २७ हजार ३७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातल्या आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची एकंदर संख्या ७० लाख ६७ हजार ९५५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर ९४ पूर्णांक १५ शतांश टक्के आहे.

सध्या राज्यात कोरोनाचे २ लाख ९३ हजार ३०५ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे राज्यात काल ४४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्याचा कोरोनाचा मृत्युदर १ पूर्णांक ८९ दशांश टक्के आहे.

राज्यात काल एकही ओमिक्रॉनबाधित नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. आत्तापर्यंत राज्यात ओमिक्रॉनचे २ हजार ७५९ रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट तर पुणे ठरला हॉटस्पॉट

मुंबईत सव्वा लाखांपर्यंत गेलेली उपचाराधीन रुग्णसंख्या काल २० हजारांच्याही खाली आली. त्याचवेळी पुण्यासह काही शहरात मात्र उपचाराधीन रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या पुणे जिल्हा कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट ठरला असून राज्यातील सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.

पुणे जिल्ह्यात सध्या ८९ हजार ५७३ कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. ठाण्यात ३८ हजार ५९७, नागपूरमध्ये २३ हजार ७०१, तर नाशिकमध्ये १६ हजार ६६३ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्येत जवळपास ८६ टक्के वाढ झाल्याचं निरीक्षण आरोग्य विभागानं नोंदवलं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *