State Eligibility Test (Set) Result Announced.
राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर.
पुणे: महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य पात्रता परीक्षा (सेट) परीक्षेचा निकाल २८ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र व गोवा राज्यात २६ सप्टेंबर २०२१ रोजी ही पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यभरातून ७९ हजार ७७४ उमेदवार बसले होते. त्यापैकी ५ हजार २९७ उमेदवार प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले असून यांची टक्केवारी ६.६४ टक्के असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव व सेटचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली. मागील वर्षी परीक्षेचा निकाल ६.७३ टक्के लागला होता.
विद्यार्थ्यांना त्यांचे ई प्रमाणपत्र ४ फेब्रुवारी पासून ऑनलाइन उपलब्ध होतील, त्यासाठी त्यांनी सेट विभागात येण्याची गरज नाही असे सेट विभागातील समन्वयक डॉ.बी.पी.कापडणीस यांनी सांगितले.
संकेतस्थळ
http://setexam.unipune.ac.in