राज्य शासनाचे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Taking inspiration from the Shiv Chhatrapati Award-winning athletes, the youth of the state will turn to sports in larger numbers शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक अधिकाधिक संख्येनं खेळांकडे वळतील हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Taking inspiration from the Shiv Chhatrapati Award-winning athletes, the youth of the state will turn to sports in larger numbers

शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक अधिकाधिक संख्येनं खेळांकडे वळतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार विजेते मान्यवर, खेळाडू मार्गदर्शकांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू, मार्गदर्शकांमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा गौरवTaking inspiration from the Shiv Chhatrapati Award-winning athletes, the youth of the state will turn to sports in larger numbers
शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक अधिकाधिक संख्येनं खेळांकडे वळतील
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

मुंबई : सन 2019-20,2020-21 व 2021-22 असे तीन वर्षांचे एकूण ११७ क्रीडा पुरस्कार क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज सेवासदन या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार सन २०१९-२० श्रीकांत शरदचंद्र वाड (ठाणे), सन २०२०-२१  दिलीप बळवंत वेंगसरकर आणि सन २०२१-२२ आदिल जहांगिर सुमारीवाला, (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा  गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झालेले श्रीकांत वाड, दिलीप वेंगसरकर, आदिल सुमारीवाला या मान्यवरांचं उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक- जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती साहसी क्रीडा पुरस्कार, दिव्यांग बांधवांसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज क्रीडा क्षेत्रातील 117 मान्यवरांना जाहीर झाले. या सर्व खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शकांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं, दिलेल्या योगदानाचा महाराष्ट्राला अभिमान आहे. या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक अधिकाधिक संख्येने खेळांकडे वळतील, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करुन महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम राखतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
१२ ऑगस्ट रोजी चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *