राम नाईक यांचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Inspiring work of Ram Naik – Governor Bhagat Singh Koshyari.

राम नाईक यांचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

कर्मयोद्धा- राम नाईक ‘ पुस्तकाचे प्रकाशन.Publication of the book Karmayoddha Ram-Naik-

मुंबई : उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची आत्मकथा मांडणाऱ्या चरैवेति! चरैवेति!! या लेखसंग्रहावर आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित कर्मयोद्धा- राम नाईक‘ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. राम नाईक यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन श्री.कोश्यारी यांनी केले.

राजभवन येथील बँक्वेट हॉलमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री.कोश्यारी बोलत होते. या प्रकाशन सोहळ्याला माजी शिक्षण मंत्री विनोद तावडेखासदार गोपाल शेट्टीआमदार आशिष शेलारआमदार मंगलप्रभात लोढानवभारत टाइम्सचे संपादक शचिन्द्र त्रिपाठीपुस्तकाचे प्रकाशक आनंद लिमयेविधिमंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, ‘कर्मयोद्धा राम नाईक‘ हे पुस्तक प्रेरणादायी आहे. श्री.नाईक यांनी केलेला संघर्ष आणि त्यातून मिळविलेले यश हे देशासाठी मार्गदर्शक‍ आहेत. श्री.नाईक यांनी त्यांचे जीवन जनतेच्या सेवेत समर्पित केले आहे. विशेषत: कुष्ठरोग पिडितांसाठी सातत्याने लढा देवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी जीवनावर आधारित कर्मयोद्धा राम नाईक‘ हे पुस्तक प्रकाशित होत आहे. याचा आनंद होत आहे. श्री.नाईक यांनी देशनिर्माण कार्यात दिलेले योगदान नक्कीच वाखाणण्यासारखे आहे. अशाच प्रकारे नव्या पिढीने देखील एकत्रित येवून काम करावे. तसेच या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचे प्रेरणादायी कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावेअशा शुभेच्छा श्री.कोश्यारी यांनी यावेळी दिल्या.

पुस्तकाविषयी राम नाईक म्हणालेउत्तरप्रदेश राज्याचे राज्यपाल असताना कर्मयोद्धा हे पुस्तक उत्तरप्रदेशातील अवधनामा या उर्दू वृत्तपत्राचे संपादक वकार रिझवी यांनी लिहिले. कोरोना महामारीमुळे या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये खंड पडला होता. या महामारी दरम्यान रिझवी यांचे निधन झाल्यामुळे या पुस्तक निर्मितीची जबाबदारी घेऊन ते पूर्णत्वास नेले. कर्मयोद्धा‘ पुस्तकाचे मराठी व्यतिरिक्त 11 भाषेत अनुवाद करण्यात आले असून याचे विशेषतः जर्मन, पारशी आणि अरबी या तीन भाषेतही अनुवाद करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी मराठीहिंदी आणि इंग्रजी भाषेतील ब्रेल लिपीतही हे पुस्तक उपलब्ध आहेत. कर्मयोद्धा‘ या पुस्तकाचे तीन खंड आहेत. यात माजी राज्यपाल राम नाईक यांच्या लेख संदर्भातील राष्ट्रपतीउपराष्ट्रपतीप्रधानमंत्री आणि विविध राज्याचे मुख्यमंत्रीखासदार यांच्या भाषणांच्या संग्रहांचा समावेश करण्यात आला आहे. हे पुस्तक नव्या पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरेलअसेही श्री.नाईक यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडेआमदार मंगलप्रभात लोढानवभारत टाइम्स संपादक शचिन्द्र त्रिपाठीप्रकाशक आनंद लिमये यांनी मनोगत व्यक्त केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *