राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋजुता खाडेची सुवर्णपदकांची हॅट्रिक. 
राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋजुता खाडेनं आज सुवर्णपदकांची हॅट्रिक नोंदवली.
ओरिसा : ओरिसात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत ऋजुता हिनं शिवाजी विद्यापिठाचं प्रतिनिधित्व केलं.
या कामगिरीमुळे शिवाजी विद्यापीठाची सर्वाधिक सुवर्णपदक मिळविलेली पहिली महिला ठरण्याचा मान ऋजुता खाडेनं पटकावला आहे.
जलतरण स्पर्धेतल्या या सुवर्ण कामगिरीमुळे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये ऋजुताचा समावेश झाला आहे.