राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेशपात्रता परीक्षा आता २८ ऑगस्ट रोजी.

National Indian Military College, Dehradun

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेशपात्रता परीक्षा आता २८ ऑगस्ट रोजी.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेशपात्रता परीक्षा जून 2021 परीक्षा दि.5 जून 2021 रोजी होणार होती परंतु एप्रिल व मे 2021 या महिन्यातील देशातील व राज्यातील कोविड-19  चा प्रादुर्भाव तसेच परिस्थितीचा विचार करुन मा. कमांडंट आर.आय. एम.सी.देहराडून, यांनी दि. 5 जून 2021 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकललेली होती परंतु सध्याची देशातील व राज्यातील कोविड-19 चा प्रादुर्भाव तसेच परिस्थितीचा विचार करुन मा. कमांडंट आर.आय.एम.सी.देहराडून, यांनी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेशपात्रता परीक्षा जून 2021 ही दिनांक 28 ऑगस्ट 2021 रोजी घेण्याबाबत कळविले आहे.

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून

 

परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक 28 ऑगस्ट 2021  रोजी  सकाळी 9.30 ते 11.00 वा. (Mathematics)-गणित,   दुपारी 12.00 ते 1.00 वा.( General Knowledge)- सामान्य ज्ञान व दुपारी 2.30 ते 4.30 वा. (English) – इंग्रजी विषयाचा पेपर होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *