राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज -विल्हेवाट धोरण हे सर्व हितधारकांसाठी समान संधी देणारे धोरण आहे -नितीन गडकरी.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज -विल्हेवाट धोरण हे सर्व हितधारकांना समान संधी देणारे धोरण आहे. आज नोएडा येथे मारुती सुझुकी टोयोत्सु इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (MSTI) ने स्थापन केलेल्या वाहन विल्हवाट आणि पुनर्वापर सुविधेचे उद्घाटन करताना ते म्हणाले की या धोरणाचे उद्दिष्ट देशातील रस्त्यांवरून अयोग्य आणि प्रदूषित वाहने टप्प्याटप्प्याने बाद करण्यासाठी एक परिसंस्था आणि अद्ययावत विल्हेवाट आणि पुनर्वापर कारखाने आवश्यक आहेत, हे आहे.
ते म्हणाले की या धोरणामुळे वाहनांची विक्री वाढवणे, रोजगार उपलब्ध करणे, आयात खर्च कमी करणे, अतिरिक्त जीएसटी महसूल निर्माण करणे आणि सेमी कंडक्टर चिपची जागतिक टंचाई दूर करण्यात मदत होईल. तसेच हे धोरण देशाची चक्रीय पुनर्वापर अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा दुवा उपलब्ध करते. प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार भंगार केंद्रे उभारावीत अशी सूचना त्यांनी केली.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अलीकडेच स्वैच्छिक वाहन-फ्लीट आधुनिकीकरण कार्यक्रम (वाहन स्क्रॅपिंग धोरण) सुरू केला आहे. या धोरणाचा उद्देश जुनी असुरक्षित, प्रदूषण करणारी वाहने टप्प्याटप्प्याने काढून टाकणे आणि त्यांच्या जागी नवीन सुरक्षित आणि इंधन-कार्यक्षम वाहने आणणे हा आहे. मंत्रालयाने नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा नियम देखील अधिसूचित केले आहेत ज्यायोगे भारतात आधुनिक वाहन स्क्रॅपिंग सुविधा स्थापन करणे शक्य होईल आणि पर्यावरणाला अनुकूल पद्धतीने वाहनांचा पुनर्वापर होईल.