भारतातील ऊर्जेची वाढती मागणी लक्षात घेता राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाने आपल्या विकासाला गती देण्याची आवश्यकता: ऊर्जामंत्री आर के सिंग.
राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचा 46 वा वर्धापन दिन साजरा.
“राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ ही विशेष संस्था असून आपल्या देशाची विकासाच्यादृष्टीने असलेली सर्वात मोठी गरज म्हणजे उर्जा पुरवणारी सर्वात मोठी कंपनी आहे”, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा मंत्री व नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंग यांनी आज केले. राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री सिंग यांनी राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाची कामगिरी, वैशिष्ट्ये, भविष्यातील उद्दिष्टे यांची रुपरेखा मांडली तसेच तिची भारताच्या ऊर्जा क्षेत्रात असलेली अग्रगण्य भूमिका विशद केली. ऊर्जा दरांची फेरमांडणी करत मागील आर्थिक वर्षात राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाने साधारणपणे 4500 कोटी रकमेचा लाभ राज्यांना करून दिल्याबद्दल सिंग यांनी या महामंडळाची प्रशंसा केली.
राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळांने स्वतःला राष्ट्रीय स्तरावरील कंपनी या ओळखीहून मोठे करत ऊर्जा क्षेत्रातील प्रचंड आणि समर्थ अशी बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून नावारूपाला येण्याचे स्वप्न बघितले पाहिजे असे सिंग यांनी सांगितले. दर दिवशी कित्येक दशलक्ष विद्युत युनिट निर्मितीचा राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाचा प्रभावी विक्रम त्यांनी अधोरेखित केला.
सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या संयंत्रांना उत्पादन , सुरक्षा, संरक्षण, पर्यावरण, संवर्धन, राज्यभाषा, सर्वोत्तम आरोग्य सुविधा, सामाजिक उत्तरदायित्व निधी आणि सामाजिक विकास तसेच प्रकल्प व्यवस्थापन विषयक स्वर्ण शक्ती पुरस्कार देण्यात आले. त्यांनी श्रम कौशल पोर्टलचे ही उद्घाटन केले.
वर्धापन दिन सोहळ्याचा आरंभ राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी गुरदीप सिंग यांच्या हस्ते नोएडा येथील अभियांत्रिकी कार्यालय प्रांगणात (EOC) ध्वजारोहणाने करण्यात आला.