राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात स्थापन केलेल्या डॉ.रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर.

The report of the working group of Dr Raghunath Mashelkar Committee established in the context of National Education Policy 2020 was presented in the meeting of the State Cabinet today.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात स्थापन केलेल्या डॉ.रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर.

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात स्थापन केलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज सादर करण्यात आला. त्यावर या धोरणाच्या अंमलबजावणीसाठीGovernment Of Maharashtra मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात विविध खात्यांच्या मंत्र्यांचाही समावेश आहे.

सध्या सुरू असलेल्या ३ वर्षांच्या अभ्यासक्रमावरुन ४ वर्षांच्या अभ्यासक्रमाकडे स्थलांतर करण्याची योजना आणि त्याबाबतचा आराखडा तयार करण्याकरिता मुंबई आणि पुणे विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाची समिती तयार करण्याला मंत्रीमंडळानं मान्यता दिली. ५० वर्ष पूर्ण झालेल्या शैक्षणिक संस्थांना विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी राज्यातल्या अकृषी विद्यापीठांचे पाच कुलगुरु आणि इतर तज्ञ यांची समिती नेमण्यात येणार आहे.

बहुविद्याशाखीय उच्च शैक्षणिक संस्थांचा आराखडा तयार करण्यासाठी तसंच राज्यातल्या शैक्षणिक संस्थांच्या अधिकार क्षेत्राचा पुनर्विचार करण्यासाठी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या पाच कुलगुरुंची एक समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती अध्यापन आणि अध्ययनाची उत्कृष्टता केंद्रे तयार करण्याच्या मुद्द्यावरही विचार करेल.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *