रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं द्वैमासिक धोरण जाहीर

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास RBI Governor Shri Shaktikanta Das हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

A bi-monthly policy of the Reserve Bank of India announced

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं द्वैमासिक धोरण जाहीर

व्याज दरात कुठलाही बदल  नाही

मुंबई : भारतीय रिझर्व बँकेनं चालू आर्थिक वर्षातील द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं. अपेक्षेप्रमाणे बॅंकेने व्याज दरात कुठलाही बदल केला नाही. धोरण आढाव्याची घोषणा करताना, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, चलनविषयक धोरण समितीने पॉलिसी रेपो दर ६ पूर्णांक ५ दशांश टक्के अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला तर स्थायी ठेव सुविधा अर्थात SDFदर ६ पूर्णांक २५ शतांश टक्के कायम ठेवला. पुर्वीच्या ६ पूर्णांक ७५ शतांश टक्यांचा सीमांत स्थायी सुविधा आणि बँक दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.

Reserve Bank of India logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
Reserve Bank of India

एमपीसीच्या सहा सदस्यांपैकी पाच सदस्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला की वाढीला पाठिंबा देताना महागाईवर लक्ष केंद्रित करून ती बरोबरीने ठेवली जाईल. RBI गव्हर्नर म्हणाले की, मार्च-एप्रिल २०२३ दरम्यान भारतातील ग्राहक किंमत महागाई कमी होऊन ती ६ पूर्णांक ७ दशांश टक्क्यांपर्यंत खाली आली. तथापि, ताज्या आकडेवारीनुसार मुख्य चलनवाढ अजूनही ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे आणि २०२३-२४ च्या आमच्या अंदाजानुसार या चलनवाढीत कुठलाही बदल होणार नाही. ते म्हणाले की आमच्या मूल्यांकनानुसार २०२३-२४ मध्ये महागाई ४ टक्कयांच्या वर राहील.

शक्तीकांत दास म्हणाले की, सर्व घटकांचा विचार करून आणि सामान्य मान्सून गृहीत धरल्यास, CPI चलनवाढ २०२३-२४ साठी ५ पूर्णांक १ दशांश टक्के राहण्याचा अंदाज आहे. त्यांनी दोन हजारांच्या नोटा बँकेतून काढण्याबाबत सांगितलं की, मे च्या तिसऱ्या आठवड्यापासून चलनातील घट आणि सरकारी खर्चात वाढ यामुळे प्रणालीतील तरलता वाढली आहे. आरबीआयचे बाजार कामकाज आणि बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दोन हजार रुपयांच्या नोटा जमा झाल्यामुळे या तरलतेत आणखी वाढ झाली आहे.

इंडियन र्मचट चेंबर चे अध्यक्ष अनंत सिंघानिया यांनी द्वैमासिक आर्थिक धोरणावर प्रतिक्रिया देतांना सांगितलं की बहुपक्षीय संस्थांची लवचिक भारतीय अर्थव्यवस्थेला मान्यता होती. ते पुढे म्हणाले की २०२३ च्या चौथ्या तिमाहीत जीडीपीची वाढ अपेक्षेपेक्षा जास्त, सकल कर संकलन उत्साहवर्धक आणि कॅपेक्सवर जोर होता. चलनवाढ कमी होणं, परकीय चलनाचा ओघ आणि ग्रामीण भागात मागणी वाढल्यामुळे अपेक्षित वृध्दी झाली असल्याचं, तसचं आजचं आर्थिक धोरण आढावा अपेक्षेप्रमाणे असल्याचं सिंघानिया यांनी सांगितलं

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *