रेन’ हा चित्रपट एका तरुणाचा कौटुंबिक सामर्थ्यशाली रचनेतून मुक्त होण्यासाठी केलेला शोध दर्शवितो.
रेन हा ईस्टोनियन दिग्दर्शक जन्नो जरगन्स यांचा हा पहिलाच चित्रपट एका कुटुंबामधील वडील आणि मुलगा यांच्यातील सामर्थ्यवान नातेसंबंधांच्या मितींचा शोध घेतो. गोव्यात सुरु असलेल्या 52 व्या इफ्फी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना जरगन्स म्हणाले की जुन्या आणि नव्या अशा दोन पिढ्यांमधील संघर्ष या या चित्रपटाला व्यापणारा मुख्य आकृतिबंध आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले की, हा चित्रपटाच्या नायकाचा स्वतःचा शोध घेण्याचा आणि ‘स्व’ च्या संशोधनाचा प्रवास आहे.
ते पुढे म्हणाले की, चित्रपट नेहमी प्रामाणिक आणि एखाद्याच्या अस्सल स्वत्वाची अंतर्ज्ञानी अभिव्यक्ती करणारे असायला हवे.
चित्रपटाचे लेखक अन्टी नौलईनेन यांनी सांगितले की, कुठल्याही कुटुंबामध्ये भाषा, वेगळ्या सवयी आणि तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या अनेक पातळ्यांवर दोन पिढ्यांमधील अंतर बघायला मिळते.
इफ्फीबाबतच्या अनुभवाबद्दल सांगताना ते म्हणाले, “इफ्फीला उपस्थित राहण्यासाठी आम्ही 700 किलोमीटरचा मोठा प्रवास करून आलो आहोत, पण सर्वत्र लोक आणि त्यांच्या भावना, समस्या एकसारख्याच असतात,” असे त्यांनी पुढे सांगितले.
चित्रपटाच्या सहायक दिग्दर्शक हेनेल जरगन्स देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 52 व्या आवृत्तीमध्ये रेन हा चित्रपट सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठीच्या स्पर्धा श्रेणी अंतर्गत सादर केला जात आहे.
दिग्दर्शक : जन्नो जरगन्स
निर्माता : क्रिस्तियन पुटसेप
पटकथा : जन्नो जरगन्स, अन्टी नौलईनेन
जाहिरात विभाग : एरिक पोलुमा
संपादक : झेमिस्लाव्ह श्रुसीलेस्की
कलाकार : अलेस्की बेलायेव्ह, मारकस बोर्कमन, मीलो एलिझाबेथ क्रीसा