Only 9% of citizens who took both doses of the vaccine became infected with a corona in Pune.
लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या केवळ ९ टक्के नागरिकांनाचं कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुण्यात निष्पनं.
पुणे : कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या केवळ ९ टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसंच लसीकरण झालेलं असल्यामुळे रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण अत्यल्प असल्याचा निष्कर्ष पुणे महापालिकेने केलेल्या विश्लेषणातून समोर आला आहे.
त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा अद्यापही न घेतलेल्या नागरिकांनी तातडीने लसीकरण पूर्ण करावं असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.
लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोना बाधित होण्याचं प्रमाण तुलनेत कमी असून संसर्ग झालेल्यांपैकी बहुतांश जण गृहविलगीकरणात राहूनच बरे झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागली नाही.
लस घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोना संसर्गामुळे अत्यवस्थ होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजय वावरे यांनी काल ही माहिती दिली.