लष्कराने पुणे येथे पहिले तंत्रज्ञान नोड सुरू केले.

Army launches first Technology Node at Pune

लष्कराने पुणे येथे पहिले तंत्रज्ञान नोड सुरू केले.

स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि उद्योगांशी सुसंवाद साधण्यासाठी, भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने 2 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित कार्यक्रमात पुणे येथे पहिल्या  प्रादेशिक तंत्रज्ञान नोडचा  (RTN – रिजनल टेक्निकल नोड) औपचारिक प्रारंभ केला. यामध्ये  सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या  (SIDM) स्टार्ट -अप मंच देखील समाविष्ट होता.Army launches first Technology Node at Pune

हा कार्यक्रम दक्षिण कमांडच्या मुख्यालयाने एसआयडीएम च्या सहकार्याने   आयोजित केला होता. आभासी आणि प्रत्यक्ष स्वरूपात आयोजित, हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित करण्यात आला आणि देशभरातील 100 हून अधिक उद्योग, स्टार्ट-अप आणि लष्करी आस्थापनांचे प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते.  लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, एव्हीएसएम, एसएम, जीओसी-इन-सी दक्षिण कमांड, यांनी आपल्या बीजभाषणात सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वेळेवर आत्मसात करणे, संरक्षण सामुग्री निर्मितीत आत्मनिर्भर होणे आणि भारतीय उद्योगाच्या भूमिकेवर भर दिला. त्यांनी उद्योगांना त्यांचे प्रस्ताव घेऊन या प्रक्रियेत भागीदार बनण्याचे आवाहन केले. यावेळी  एसआयडीएमचे अध्यक्ष जयंत डी पाटील,  मेजर जनरल कीर्ती जौहर, व्हीएसएम, आर्मी डिझाईन ब्युरोच्या  अतिरिक्त महासंचालक, एस.पी. शुक्ला, उपाध्यक्ष एसआयडीएम , एसआयडीएम स्टार्ट-अप फोरमचे अध्यक्ष अभिषेक जैन आणि कर्नल राजिंदर सिंग भाटिया (निवृत्त), अध्यक्ष आणि सीईओ संरक्षण, भारत फोर्ज लिमिटेड आदी मान्यवर  उपस्थित होते.

सरकारच्या आत्मनिर्भरता आणि मेक इन इंडिया उपक्रमाला अनुसरून, संरक्षण मंत्रालय आणि लष्कराने परदेशी पुरवठादारांवरील अवलंबत्व कमी करण्याच्या उद्देशाने संरक्षण उपकरणांच्या स्वदेशीकरणात मोठी भरारी घेतली  आहे आणि संरक्षण सामुग्रीचे  निर्यात केंद्र म्हणून उदयास येत आहे. पुणे येथे आरटीएनचा प्रारंभ झाल्यामुळे सैन्य संरचना विभागाची व्याप्ती  दक्षिणेकडील टेक हबपर्यंत विस्तारली आहे. यामुळे उद्योग, एमएसएमई आणि स्टार्ट-अपना पुढे येण्यासाठी आणि लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या गरजांवर उपाय सुचवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *