लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ पदाचा कार्यभार स्वीकारला.

Lieutenant General Arvind Walia

लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी पुणेस्थित दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ पदाचा कार्यभार स्वीकारला.

Lieutenant General Arvind Walia
Lieutenant General Arvind Walia

लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी पुण्याच्या राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे  पुष्पचक्र अर्पण करून पुणेस्थित  दक्षिण कमांड मुख्यालयाच्या  चीफ ऑफ  स्टाफ पदाचा  कार्यभार स्वीकारला.

लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया हे देहरादूनच्या भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत तिथे त्यांना प्रतिष्ठित रौप्य पदक प्राप्त झाले आहे.  डिसेंबर 1986 च्या अभियंता तुकडीचे  ज्येष्ठ अधिकारी,असलेल्या लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांना त्यांच्या प्रतिष्ठित लष्करी कारकीर्दीत विविध कमांड आणि लष्कराच्या विविध विभागात विस्तृत आणि परिपूर्ण कार्यान्वयनाचा अनुभव आहे. वाळवंटी  क्षेत्रात स्वतंत्र लष्कराच्या स्वार्डनचे कमांडन्ट म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. जम्मू -काश्मीरमध्ये त्यांनी रेजिमेंट प्रमुख  आणि पश्चिम आघाडीवर एक अभियंता  ब्रिगेडचे ते प्रमुख होते. त्याशिवाय बंगगळुरू येथे एमईजी आणि केंद्राच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ, वेलिंग्टन, सिकंदराबादच्या संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयाचे आणि नवी दिल्ली येथील प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे पदवीधर आहेत. त्यांनी  लष्कराच्या  सर्व अभ्यासक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.त्याच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये अभियांत्रिकी पदवी  (ऑनर्स), बीआयटीएस पिलानीमधून स्थापत्य अभियांत्रिकी, मद्रास विद्यापीठातून एमएससी संरक्षण आणि सामरिक अभ्यास , उस्मानिया विद्यापीठातून व्यवस्थापन अभ्यासातील पदव्युत्तर पदवी तसेच उस्मानिया आणि मद्रास या दोन्ही विद्यापीठातून एम फिल पदवी यांचा समावेश आहे.

संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालय , सिकंदराबाद आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय , दिल्ली येथे त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी डोंगराळ भागात कार्यरत लष्करी ब्रिगेडचे ब्रिगेड मेजर , संरक्षण मंत्रालयाच्या (लष्कर) एकात्मिक मुख्यालयातील प्रमुख अभियंता  शाखेचे संचालक, हल्ला करण्यासाठी विशेष तुकडी असलेल्या  स्ट्राइक कोअर मध्ये ब्रिगेडियर क्यू आणि कमांडचे मुख्य अभियंता यासह लष्करातील प्रतिष्ठित पदांवर त्यांनी काम केले आहे. लेफ्टनंट जनरल वालिया आणि त्यांच्या पत्नी श्रीमती अनिता वालिया यांचे पुणे येथील लष्करी अधिकाऱ्यांनी उत्साहाने स्वागत केले.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *