वडगाव आनंद येथे कळमजाईमाता प्रवेशद्वाराचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते लोकार्पण
पुणे : दिवंगत भिमाजीशेठ गडगे यांच्या स्मरणार्थ वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथे बांधण्यात आलेले प्रवेशद्वार हे वडगाव आनंद गावच्या वैभवात भर टाकणारे असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथे दिवंगत गडगे यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या कळमजाईमाता प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा महसूल मंत्री श्री. थोरात यांच्या हस्ते आणि आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत आज झाला.
भिमाजीशेठ गडगे यांच्या स्मरणार्थ भव्य असे हे प्रवेशद्वार विघ्नहर कारखान्याचे माजी संचालक सुरेश गडगे आणि कुटुंबीयांनी बांधले आहे. या प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सुरेश गडगे, शांताबाई गडगे, राहुल खोकले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंतराव चौगुले, दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी उपसरपंच संतोष चौगुले, गोमाता दूधसंस्थेचे अध्यक्ष अशोक गडगे, सोसायटी अध्यक्ष पांडुरंग गडगे, कैलास वाळुंज, सुरेश गडगे, जालिंदर गागरे आदी उपस्थित होते.