Covid vaccination including precautionary dose should be deferred by three months after recovery from Covid-19 illness: Govt
वर्धकमात्रेसाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी कोरोनामुक्त झाल्यावर ३ महिन्यांनी मात्रा घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश.
नवी दिल्ली : तिसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लशीची राहिलेली मात्रा 3 महिन्यांनी घ्यावी, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिला आहे.
वर्धकमात्रेसाठी पात्र असलेल्या व्यक्तींनीही कोरोनामुक्त झाल्यावर 3 महिन्यांनी ही मात्रा घ्यावी असं यात म्हटलं आहं.(Covid vaccination including precautionary dose should be deferred by three months after recovery from coronavirus infection)
15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरण या महिन्याच्या 3 तारखेपासून सुरू झाले. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत या महिन्याच्या 10 तारखेपासून आरोग्य सेवा कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी खबरदारीच्या वर्धक मात्रा द्यायला सुरू झाली आहे.