In the case of the abortion of a girl in Arvi taluka of Wardha district, Strict action should be taken against the culprits.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील मुलीच्या गर्भपात प्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून निवेदन.
मुंबई : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांकडून संबंधित डॉक्टर व आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेच्या अनुषंगाने शहानिशा करुन गृहमंत्री तसेच गृह राज्यमंत्री यांना पत्राद्वारे या घटनेबद्दल माहिती दिली, असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.
या प्रकरणात आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मदत करणारे, त्यांचे साथीदार यांचा शोध घेवून त्यांना त्वरीत अटक करण्यात यावी.
कायदेशीर गर्भपात करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समिती असते. या समितीची बैठक प्रत्यक्ष किंवा दूरदृश्य प्रणालीमार्फत नियमित होणे गरजेचे आहे.महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत अख्यात्यारित येणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयातील ‘जैव वैद्यकीय कचरा’ किती होतो, किती प्रमाणात गोळा केला जातो याबाबतचा तपशील, अहवाल सर्व हॉस्पिटल यांनी संबंधित प्रशासनाला द्यावा.
पिडितेला मनोधैर्य योजनेतून तात्काळ मदत मिळवून देण्यात यावी, अशा मागण्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.