वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट ऑफ योगला अभ्यासक्रमासाठी प्रवेशक्षमता वाढ करण्यास परवानगी.

Vasantdada Patil Ayurvedic Medical College and Institute of Yoga allowed to increase admission capacity for the course

वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट ऑफ योगला अभ्यासक्रमासाठी प्रवेशक्षमता (Medical Admission)वाढ करण्यास परवानगी.

मुंबई : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील वंसतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट ऑफ योगला आयुर्वेद पदवी अभ्यासक्रमाच्या ( B A M  S Admission) प्रवेशक्षमतेत वाढ करण्यासMaharashtra Govt परवानगी देण्यात आली आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून ही परवानगी देण्यात आली असून बी.ए.एम.एस. पदवी अभ्यासक्रमाची(B A M S Admission) 40 वरुन 60 (EWS सह 50 वरुन 75) इतकी असणार आहे.

या आयुर्वेद महाविद्यालयातील बी.ए.एम.एस.पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थी प्रवेशक्षमता ( Medical Admission) ही भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोग यांनी निर्धारीत केल्यानुसार राहील. 

सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता (Medical Admission) निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थी प्रवेश करण्यात येतील. महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट, 1987 मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *