The ‘Vasantotsav’ will be held from January 20 to 23.
‘वसंतोत्सव’ येत्या २० ते २३ जानेवारी दरम्यान रंगणार.
पुणे : डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा ‘वसंतोत्सव’ येत्या २० ते २३ जानेवारी दरम्यान गणेश कला क्रीडा रंगमंच इथं रंगणार आहे.
महोत्सवाचं हे १५ वं वर्ष असून राज्य सरकारनं कोरोना संबंधी घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करत महोत्सव पार पडेल, अशी माहिती गायक राहुल देशपांडे यांनी दिली आहे. यंदाच्या वसंतोत्सवात शास्त्रीय गायन, तालवाद्य, दाक्षिणात्य आणि हिंदुस्थानी संगीत याबरोबरच लाईट म्युझिक आणि गझल यांसारख्या वैविध्यपूर्ण संगीत प्रकारांची रेलचेल असेल, असंही त्यांनी सांगितलं.