Universities should strive for world class health education – Dr. Bharti Pawar
विद्यापीठांनी जागतिक दर्जाच्या आरोग्य शिक्षणासाठी प्रयत्न करावेत- डॉ. भारती पवार
मेडिकल आणि पॅरामेडिकल शाखांमध्ये संशोधनाला मोठ्या प्रमाणात वाव
नाशिक: विद्यापीठांनी जागतिक दर्जाच्या आरोग्य शिक्षणासाठी प्रयत्न करावेत तसचं मेडिकल आणि पॅरामेडिकल शाखांमध्ये संशोधनाला मोठ्या प्रमाणात वाव असल्यानं त्यावरही विद्यापीठांनी भर द्यावा असं मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे. त्या आज नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या सांगता समारंभात बोलत होत्या.
आरोग्य विद्यापीठाच्या वतीने कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती यावेळी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा वणीकर आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या सचिव अश्विनी जोशी यांनी सांगितलं. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर, माजी कुलगुरू डॉ. मधुरा फडके, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com