विद्यार्थ्यांसाठी वित्तीय साक्षरता विशेष प्रश्नमंजुषा परीक्षचे आयोजन

Reserve Bank of India logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Conduct of financial literacy special quiz test for students

विद्यार्थ्यांसाठी वित्तीय साक्षरता विशेष प्रश्नमंजुषा परीक्षचे आयोजन

पुणे : भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या समन्वयाने जी २० व अमृत महोत्सवी  वर्षानिमित्त दिनांक 3 जुलै 23 रोजी विद्यार्थ्यांसाठी वित्तीय साक्षरता विशेष प्रश्नमंजुषा परीक्षा बिबवेवाडी पुणे येथे आयोजित केली होती.

Reserve Bank of India logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
Reserve Bank of India

या कार्यक्रमास एल. डी. ओ. व व्यवस्थापक भारतीय रिझर्व बॅंक मुंबई श्री. निखिल गुलाक्षी , जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक तथा मुख्य प्रबंधक श्री. श्रीकांत कारेगावकर ,अग्रणी बँक अधिकारी श्री. प्रमोद सूर्यवंशी तथा वित्तीय साक्षरता अधिकारी श्री पी. एस. सरडे मुख्याध्यापक, श्री. धाकपाडे तसेच पुणे जिल्ह्यातील विविध शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.

गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून उपस्थित सर्व शिक्षकांचा बँकेच्या वतीने सत्कार सत्कार करण्यात आला. क्विझ मधील सहभागी शाळांमधून जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम रुपये दहा हजार, ट्रॉफी व प्रशस्तीपत्रकाचे पारितोषिक कुमारी प्राजक्ता सुभाष आबनावे व कुमार यश शंकर पंडित, शासकीय सफाई कर्मचाऱ्यांच्या मुला मुलींची शाळा येरवडा यांनी पटकविले.

सदर विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धे (स्टेट लेवल कॉम्पिटिशन) मध्ये निवड झाली असून तिचा पुढील टप्पा देश पातळीवर असणार आहे सदर क्वीज करिता सहभागी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता व इतर सर्व सोयी सुविधा भारतीय रिझर्व बँकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या मान्यवरांचे हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमात मा. श्री निखिल गुलाक्षी आर. बी. आय. मुंबई व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तथा मुख्य प्रबंधक मा. श्री. श्रीकांत कारेगावकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे उद्घाटन
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *