विधानसभा अध्यक्षांची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्याचा निर्णय – नाना पटोले.
मुंबई: कायदेशीर पेच टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणं टाळलं. आता ही निवडणूक फेब्रुवारीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मुंबईत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.
नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही, असं ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात राज्यपाल यांना पत्र पाठवून संपूर्ण प्रक्रिया कळवण्यात आली होती. राज्यपालपदाचा कुठेही अपमान होणार नाही याची काळजी सरकारने घेतली होती. अध्यक्षपदाची संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात पार पाडता आली असती. परंतु शेवटच्या दिवशी सकाळी राज्यपालांनी पुन्हा पत्र पाठविले. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलल्याचं ते म्हणाले.