वैष्णव देवी भवन परिसरात भाविकांची चेंगराचेंगरी होऊन १२ जणांचा मृत्यू.

जम्मू काश्मीरमधील वैष्णव देवी भवन परिसरात भाविकांची चेंगराचेंगरी होऊन १२ जणांचा मृत्यू.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये कटरा इथं वैष्णव देवी भवन परिसरात आज सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले. गर्दीमध्ये अफवा पसरल्यामुळे चेंगरा चेंगरी झाल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. जखमींना श्री माता वैष्णव देवी नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वैष्णव देवी इथं झालेल्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेत बाधित झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी सह वेदना व्यक्त केली आहे.

माता वैष्णव देवी भवन इथल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडणाऱ्या भाविकांप्रती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. दुर्घटनेतल्या मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये  मदत जाहीर झाली आहे. गृह मंत्री अमित शाह यांनी  माता वैष्णोत देवी मंदिर इथल्या दुर्घटनेबद्दल  शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेत बाधित झालेल्यांना प्रशासन मदत करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

वैष्णव देवी इथंलुई दुर्घटना हृदय हेलावणारी असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. सूचना आणि  प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी वैष्णव देवी इथल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकां-प्रति सहवेदना व्यक्त केली आहे. तसंच दुर्घटनेत जखमी झालेले भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना आपल्या संदेशामधून  केली आहे.

दरम्यान श्री माता वैष्णव देवी मंदिर बोर्डानं मदत क्रमांक जारी केले आहेत. 01991-234804, 01991-234053 असे हे मदत क्रमांक आहेत. 
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *