शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी

NCP Leader Ajit Pawar Hadapsar Latest News Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

Central and state governments should take serious note of the threat given to Sharad Pawar

शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी – अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शुक्रवारी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एका ट्विटर हँडलवरुन आणि फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांच्याविषयी भाष्य करण्यात आले आहे.

NCP Leader Ajit Pawar Hadapsar Latest News Hadapsar News हडपसर मराठी बातम्या
File Photo

या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून याबाबत राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया देत कारवाईची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. समाज विघातक प्रवृत्तींना वेळेवर रोखणं राज्याच्या हिताचं असेल, असं ते यावेळी म्हणाले.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, तरी देशातली जनता आता सावध असून कोणत्याही भूल-थापांना बळी पडणार नाही, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरचे अत्याचार, वाढती महागाई आणि बेरोजगारी याच मुद्यांवर भर दिला जाणार असून, विकासाच्या मुद्यावरुन राज्याची जनता मागे हटणार नाही, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि तात्काळ कारवाईची मागणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुमचा दाभोलकर करु’, अशी धमकी ट्वीटरवरुन शरद पवार यांना देण्यात आली आहे. धमकी देणारा हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या धमकीप्रकरणावर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

भाजपचा कुठलाही कार्यकर्ता असेल तर तो अशा प्रकारची कुठलीही कृती करणार नाही. कुणाला धमकी द्यावी, अशी भाजपची सभ्यता नाहीये, असं भाजप नेते गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे. राजकीय नेत्यांना धमकी देणं हे खपवून घेतलं जाणार नाही, असं देखील महाजन यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *