शरद पवार राजीनाम्याबाबत १-२ दिवसांत अंतिम भूमिका घेणार

Sharad Pawar's decision to quit the post of NCP President राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा शरद पवार यांचा निर्णय हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Sharad Pawar will take a final stand regarding resignation in 1-2 days

शरद पवार राजीनाम्याबाबत १-२ दिवसांत अंतिम भूमिका घेणार

तुमच्या सगळ्यांची भावना नजरेसमोर ठेऊन आणि बाहेरून आलेल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन, येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम भूमिका घेऊ

दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाहीSharad Pawar's decision to quit the post of NCP President राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा शरद पवार यांचा निर्णय हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं ठिय्या आंदोलन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या प्रांगणात सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी लावून धरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पत्र लिहिले आहे अनेक आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र सुरू केला आहे. शरद पवार जोपर्यंत राजीनाम्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

पवार साहेब तुमची महाराष्ट्राला गरज आहे आगामी काळातील निवडणुका बघता आमच्यासारख्या तरुणांना तुमच्यासारख्या अनुभवी नेत्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही राजीनामा देऊ नका. तुमच्यामुळेच पक्ष आहे अशा पद्धतीच्या विनवण्या करत अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घ्यावा असा हट्ट लावून धरला आहे.

आज शरद पवार यांनी या आंदोलक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मी राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राबाहेरून तुमचे अनेक सहकारी इथं आले आहेत. राजीनाम्याबाबत मी तुमच्यासोबत चर्चा करायला हवी होती, मात्र मी तुमच्यासोबत जर चर्चा केली असती तर तुम्ही मला राजीनामा देऊ दिला नसता. त्यामुळे माझा हेतू स्वच्छ होता. त्यावरून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

उद्या संध्याकाळपर्यंत माझी त्यांच्याबरोबर बैठक होईल. त्यानंतर तुमच्या सगळ्यांची भावना नजरेसमोर ठेऊन आणि बाहेरून आलेल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन, येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम भूमिका घेऊ. पण ती भूमिका घेताना कार्यकर्त्यांच्या मनातली भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, असं पवार म्हणाले.

दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, याची खात्री देतो, असंही ते म्हणाले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *