शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ.

Extension of deadline for filling up the online application form for the scholarship examination.

शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ.

पुणे : पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची (इ.आठवी) अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द झाली आहे. परीक्षेच्या नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी १ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत मुदत देण्यात आली होती.

शाळांना माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी १५ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी. ३१ जानेवारीनंतर ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र किंवा शुल्क भरता येणार नाहीत.

आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नसल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त एच.आय.आतार यांनी कळवले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *