Crop insurance to farmers by paying only Re 1
शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरून पीक विमा
शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदणीसाठी अतिरिक्त रक्कम देऊ नये-कृषि आयुक्
पुणे : शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कमेची मागणी होत असल्यास संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरून https://pmfby.gov.in या पोर्टलवर पीक विमा योजनेतील सहभागाची नोंदणी करता येते. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रु. ४० देण्यात येते. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामाकरिता ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन २०२३-२४ पासून ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे, शेतकऱ्यांनी कोणतीही अतिरिक्त रक्कम नोंदणीसाठी देऊ नये, असे कृषि विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरून पीक विमा”