शैली सिंग, रिद्धिमा व्ही कुमार यांची ‘टीओपीएस’साठी निवड.

Target-Olympic-Podium-Scheme

लांब उडीपटू शैली सिंग, बॅकस्ट्रोक जलतरणपटू रिद्धिमा व्ही कुमार यांची ‘टीओपीएस’साठी निवड.

मुंबई:  यावर्षाच्या प्रारंभी झालेल्या 20 वर्षाखालील जागतिक अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रजत पदक विजेती 17 वर्षीय शैली सिंगची निवड कोअर ग्रुप ऑफ अॅथेलेटसमध्ये झाली आहे. युवाTarget-Olympic-Podium-Scheme व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने ‘टार्गेट ऑलिपिंक पोडियम स्कीम म्हणजेच ‘टीओपीएस- टॉप्स’ योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या या गाभा समूहाच्या माध्यमातून शैली सिंगला स्पर्धेसाठी आवश्यक असणारे पाठबळ देण्यात येणार आहे.  या संदर्भात गुरूवारी एमओसी म्हणजेच मिशन ऑलिंपिक सेलची बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

एमओसीने गाभा समूहामध्ये 50 खेळाडूंना सहभागी करून घेतले आहे. आणि वेगवेगळ्या आठ क्रीडा प्रकारांमधल्या 143 खेळाडूंचा समावेश डेव्हलपमेंट ग्रूपमध्ये करण्यात आला आहे. या दुस-या यादीमुळे आता एमओसीमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची संख्या 291 झाली आहे. यामध्ये गाभा समूहातल्या 102 खेळाडूंचाही समावेश आहे. 2024 मध्ये होणा-या स्पर्धांसाठी या खेळाडूंना तयार करण्यात येणार आहे. यामध्ये ऑलिंपिकमध्ये 13 क्रीडाप्रकारांसाठी  आणि  पॅराऑलिपिंकमध्ये सहा क्रीडाप्रकारांसाठी तयारी करून घेण्यासाठी क्रीडापटू निश्चित करण्यात आले आहे.

आत्तापर्यंत निवड करण्यात आलेल्या क्रीडापटूंपैकी रिद्धिमा वीरेंद्र कुमार ही सर्वात लहान जलतरणपटू आहे. या 14 वर्षांच्या मुलीने  ऑक्टोबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय कनिष्ठ विजेतेपदाच्या स्पर्धेत पदक पटकावले आहे. तिचे नाव डेव्हलपमेंट ग्रुपबरोबरच गाभा समूहातल्या 17 जलतरणपटूंमध्ये आहे. याशिवाय आणखी दोन खेळाडूंचीही नावे या यादीत आहेत.

पुढच्या वर्षी जूनमध्ये होणा-या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर जलतरण पटूंच्या सूचीचा आढावा घेण्यात यावा, अशी शिफारस उप-समितीने केली असून ती एमओसीने स्वीकारली आहे. पुढच्या महिन्यामध्ये होत असलेल्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेनंतर तिरंदाजीच्या सूचीचा आढावा घेण्यात येईल. त्याचबरोबर घोडस्वारी, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, ज्युडो आणि टेनिस यासारख्या इतर खेळांच्या खेळाडूंविषयी नंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *