श्रीला भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान 1 सप्टेंबर रोजी एक विशेष स्मृती नाणे जारी करणार.
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीला भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता 125 रुपयांचे एक विशेष स्मृती नाणे जारी करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.
श्रीला भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी यांच्याबद्दल
स्वामीजींनी कृष्णाबाबत जागरूकतेसाठी आंतरराष्ट्रीय संस्था (इस्कॉन) ची स्थापना केली जी “हरे कृष्ण चळवळ” म्हणून देखील ओळखली जाते. इस्कॉनने श्रीमद्भगवद्गीता आणि इतर वैदिक साहित्याचे 89 भाषांमध्ये भाषांतर केले आहे, जे जगभरातील वैदिक साहित्याच्या प्रसारामध्ये एक प्रमुख भूमिका बजावत आहे.
स्वामीजींनी शंभरहून अधिक मंदिरांची स्थापना केली आणि जगाला भक्ती योगाचा मार्ग शिकवणारी अनेक पुस्तके लिहिली.
या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री उपस्थित राहणार आहेत.