संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘कोरोनामुक्त वार्ड’ करा

Covid-19-Pixabay-Image

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘कोरोनामुक्त वार्ड’ करा – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश.

कोरोनामुळे निधन झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना तात्काळ नियुक्तीची कार्यवाही करा. Covid-19-Pixabay-Image

‘कोरोनामुक्त गाव’ या उपक्रमाप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘कोरोनामुक्त वार्ड’ करा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी आज दिल्या.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेतील कामकाजाचा आढावा महानगरपालिका सभागृहात घेण्यात आला. त्यामध्ये कोरोना महामारीचा काळात महानगरपालिकेने केलेल्या नाविन्यपूर्ण कामाचा आढावा, कोरोनाच्या काळात सामान्य नागरिक, कामगार, शेतकरी, मजूर यांना मदत देण्यासाठी शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या योजनांचा आढावा. कृषी विभाग, कामगार विभाग, परिवहन विभाग, रोहयो व आदिवासी कल्याण विभाग, महिला व बाल विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागाचाही आढावा घेतला.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, गटनेते पृथ्वीराज सुतार, पक्षनेत्या फरजना शेख, आयुक्त विक्रम कुमार, पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, ज्ञानेश्वर मोळक,, उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, आरोग्य प्रमुख डॉ.आशिष भारती, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांच्यासह नगरसेवक व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर; शासनाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अंदाजे ३० कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. या निधीच्या माध्यमातून नागरिकांना मदत करण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे निधन झालेल्या महानगरपालिकेतील 88 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्वावर प्रलंबित नियुक्त्या तात्काळ देण्याची कार्यवाही करा. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बांधकाम कामगार, घरेलू तसेच वेगवेगळ्या कामात कार्यरत कामगारांची नोंदणी करण्यासाठी सर्व संबंधीत विभागाची मदत घेवून विशेष मोहीम राबवा. महिला बालविकास विभागाने कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याने 407 विधवा महिलांचे पुनवर्सन करण्यासाठी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन समुपदेशन करा. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, महिला विकास आर्थिक विकास महामंडळ या सारख्या महामंडळाची मदत घेवून विधवा महिलांचे पुनवर्सन करा. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 15 ऑक्टोबर पर्यंत अहवाल सादर करा. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवा.

राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विषयांचा पाठपुरावा करुन त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी दिल्या.

आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महानगरपालिकेतंर्गत कोरोना सद्यस्थिती, बेड सद्यस्थिती, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण, ऑक्सिजन, मृत्यूदर, लसीकरण, म्युकरमायकोसिस, औषधसाठा, मिशन झिरो मोहीम, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करण्यात येणारी तयारी यांच्यासह इत्यादीबाबत माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *